Romantic Marathi Ukhane for Female
गळ्यातील मंगळसूत्र, मंगल सुतात डोरले,
रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले.
काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
रावांचं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून
चंद्राचा झाला उद्य अन् समुद्राला आली भरती,
रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती.
दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
रावांचे नाव घेते तुमच्या साठी
माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.
सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा,
रावामुळेच लागला मला त्याचा लळा.
नववधु आले मी घरी, जीव माझा गेला बावरुन,
रावांनी मारली हाक, शिणच गेला निघुन.
हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात,
रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे,
रावांच्या साथी साठी माहेर सोडावे लागे.
रुप्याची साडी, तिला सोन्याचा गिलावा,
रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा.