स्मार्ट स्त्रीयांसाठी ऊखाणे
(Smart Marathi Ukhane for Female)
लग्नाच्या पंगतीत, घेतला उखाणा खास,
आणि रावांच्या घशात अडकला घास
उखाणा घे उखाणा घे, करू नका गलबला,
पूर्वपुण्याईने रावां सारखे पती लाभले मला.
लग्नासारख्या मंगलदिनी नका कोणी रुसू,
रावां ना घास देताना येते मला गोड हसू.
मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
रावांबरोर संसार करीन सुखाचा.
हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
रावांना घास घालायला वेळ कशाला हवा.
अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे रावांची राणी.