गमतीदार मराठी उखाणे
(Funny Marathi Ukhane)

गणेश सोसायटी, पाचवा मजला,रूम नंबर १२ दरवाज्याला अडकवली घंटी,

ऐर्श्वर्याचं नाव घेतो ती माझी बबली आणि मी तिचा बंटी.

स्टुलावर स्टूल बत्तिस स्टूल,

राव एकदम ब्यूटिफुल.

पुढे जाते वासरू, मागून येते गाय,

_ ला आवडते नेहमी दुधावारची साय.

साखरेचे पोते सुई ने उसवले,

_ ने मला पावडर लाऊन फसवले.

समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,

राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू.

हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू,

मी आहे लंबू आणि _ किती टिंगू.

कॉलेजमध्ये असताना होते मी याची दिवानी,

_ नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी.

केळीचं पान टरटर फाटतं,

_ ह्याचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं.

ही पण आहे सुंदर ती पण आहे छान,

कोणाकोणावर प्रेम करू मी आहे परेशान.

काल होती फ्रायडे नाईट, करून आले मी पार्टी,

यांनी दिलं मला लिंबूपाणी, कारण नवरा माझा स्मार्टी.

चांदीच्या ताटात  _ चे पेढ,

_ माझे हुशार, बाकी सगळे वेडे.

चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी,

_ माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी

गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू,

_ चा मुका घ्यायला, मी कशाला लाजू.

सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून

प्रविण रावांचे नाव घेते पाच गडी राखून

एमएसईबी च्या तारेवर टाकला होता आकडा,

लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा.

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,

राव घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!

खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका,

ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *