स्त्रीयांसाठी ऊखाणे
(Marathi Ukhane for Female)

गुलाबाचे फुल दिसायला ताजे,

रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा,

रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा

नव्हती कधी गाठ भेट, एकदाचं झाली नजरा नजर,

आई-वडी विसरले रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर

दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे,

रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.

निळ्या नभात चंद्राचा प्रकाश,

रावांवर आहे माझा विश्वास.

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,

रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.

सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
रावांचे नाव घेते ….ची सून

सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,

राव मला मिळाले आहेत ते अनुरूप

शंकरासारखा पिता, अन गिरिजॆसारखी माता,

रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता

आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी,

रावांच नाव घेते बारशाच्या दिवशी.

अक्षता पडताच अंतरपाट होतो दूर,

रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर..!

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती,

रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,

रावांच नांव घेताना, कसला आला आळस

डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले

अभिनव रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले

तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,

अजय रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.

वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा,

आकाश रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.

धरला यांनी हात, वाटली मला भिती,

हळूच म्हणाले, राव अशीच असते प्रिती.

दारी होता टेबल, त्यावर होता फोन,

रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,

रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला,

आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,

रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश.

सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,

रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी,

रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी.

पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,

रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.

लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,

रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.

 

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,

रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार,

पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला,

रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.

पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन,

रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन.

नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद,

रावांचे नाव घेते दया सत्यनारायणाचा प्रसाद!

प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,

रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची.

चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,

रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,

रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा,

रावांनी आणला मला मोग-याचा गजरा,

चांदीचे जोडवे पतीची खुन,

रावांचे नांव घेते,… ची सुन.

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,

रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.

तेलाच्या दिव्याला तुपाची वात,

रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात

शुभ्र फुलांच्या मखमळीवर शुभमंगल झाले,

रावांची मी छाया होऊन सप्तपदी चालले

विवाहाला अग्निनारायाणाची असते साक्ष,

रावांच्या संसारात मी राहीन सदैव दक्ष

नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
….. च्या घराण्यात ….. रावांची झाले महाराणी

जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा,

रावांच्या सह संसार, करीन मी सुखाचा

गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,

रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती

अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,

काल होते मी युवती, आज झाले रावांची सौभाग्यवती

जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,

रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद

झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची,

राव सुखी रावो हीच आस मनाची

भोळ्या शंकराला बेलाची आवड,

रावांची पती म्हणून केली मी निवड

दुधाचा केला चहा चहाबरोबर होती खारी

राव हे जगात लयभारी.

राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा,

रावांचे नाव घेते, आशिर्वाद द्यावा सौभाग्याचा

हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,

रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.

मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,

यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,

रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.

कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,

चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात.

रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.

ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,

….. चे नाव घेते …. च्या दिवशी.

सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे,

रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे.

छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,

भाऊसाहेब रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.

कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,

जगन्नाथ रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर,

जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन,

घडविले देवानी मधुकर रावांना जीव लावून,

शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल,

रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.

रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,

त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.

अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,

आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे रावांची राणी.

पूजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा,

रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.

सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,

रावांचे नांव घेते, …च्या घरात.

सुशिक्षीत घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,

बाबासाहेब रावांशी लग्न करुन सौभाग्यवती झाले.

मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण,

रावांचे नाव घेते ….ची मी सून

मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला,

रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

राम सीता लक्ष्मण चालले वनात,

रावांच्या मी आहे सहभागी जीवनात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *