उखाणे म्हणजे काय? What are Marathi Ukhane?
अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी वस्तू/घटना सुचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काव्यमय पंक्तींना उखाणा असे म्हणतात. हा मराठी संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार आहे. पारंपरिक कौटुंबिक व्यवस्थेत पत्नीने पतीचे नाव चार चौघात उच्चारणे टाळले जात असे. महाराष्ट्रात विवाह कार्यक्रम आणि इतर विशिष्ट प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तींनी नाव घेण्यास सांगितल्यानंतर पतीचे नाव एखाद्या काव्यमय पंक्तीत गुंफून अप्रत्यक्षरित्या घेत असते. नवरेसुद्धा आपल्या पत्नीचे नाव अशाच रीतीने घेतात.
Marathi Ukhane
महिलांसाठी उखाणे
(Marathi Ukhane for Female)
……च्या पूजेला जाई-जुईच्या राशी,
…..च नाव घेत हळदी-कुकवाच्या दिवशी.
कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा,
अमोल रावांचे नांव घेते, सारे जण बसा”
मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,
हनुमंत रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल
करवंदाची साल चंदनाचे खोड,
महेश रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड
एक तीळ सातजण खाई,
रोहीत रावांना जन्म देणारी धन्य ती आई.
अंगणात होती मेथी, पाणी घालु किती,
तानाजी रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.
घातली मी वरमाला, हसले गणपत राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन,
भरत रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन
गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट,
आकाश रावांचे नाव घेते सोडा माझी वाट.
प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात,
तुषार रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.
उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
शुभम रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल
साखरेचे पोते सुई ने उसवले,
नेहा ने मला पावडर लाऊन फसवले
एका वर्षात महिने असतात बारा,
राहुल रावांमुळे वाढलाय आनंद सारा!
गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
सतिश रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
संदीप रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,
विनायक रावांसारखे मिळाले पती, भाग्य मानू किती.
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
प्रतीक रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
शरद रावांचे हेच रूप मला फार आवडले.
काचेच्या बशीत बदामचा हलवा,
साहेबरावांचे नाव घेते, सासुबाईंना बोलवा.
आकाशात उडतोय पक्षांचा थवा,
राजेश चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
मंदिरात वाहाते फुल आणि पान,
प्रतिक रावांचे नांव घेते ठेऊन सर्वांचा मान.
डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
मोहन रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.
ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात,
सुभाष राव आणि माझी जोडी ठेव सुखात.
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
रविंद्र रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
प्रल्हाद राव आहेत आमचे फार नाजुक.
लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,
बदलावा लागतो स्वभाव,
अतिश रावांच्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.
गृहप्रवेश उखाणे
Gruhpravesh Ukhane
वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
संदीप रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद,
माहेरचे निरंजन आणि सासरची फूलवात,
वियजसिंह रावांचे नाव घेउन करते मी संसाराला सुरूवात.
पुरुषांसाठीचे मराठी उखाणे
Marathi Ukhane for Male
हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,
सिद्धी मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
हळदी कुंकू उखाणे
Haldi Kunku UKhane
लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,
बदलावा लागतो स्वभाव,
अतिश रावांच्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.
नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी,
अशोक जीवनात नेहा ही गृहिणी.
सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,
माधवरावांचे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.
जात होते फुलांला, पदर अडकला वेलीला,
एवढे महत्त्व कशाला प्रीतम रावांच्या नावाला.
……च्या पूजेला जाई-जुईच्या राशी,
…..च नाव घेत हळदी-कुकवाच्या दिवशी.
मकरसंक्रांती उखाणे
Sankranti Ukhane
गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशी,
दिपकरावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवशी
असंख्य तारे नभात पाहावेत निरखून,
रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून.
तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा,
रावांचे नाव घ्यायची हीच तर खरी वेळा.
सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,
रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ.
कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी कुंकुवाच्या राशी,
रावांच्या नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या दिवशी.
तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात,
रावंच नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.
गमतीदार मराठी उखाणे
Ukhane in Marathi Comedy
साखरेचे पोते सुई ने उसवले,
नेहा ने मला पावडर लाऊन फसवले.
एक होती चिऊ एक होती काऊ,
अंजली चे नाव घेतो, डोक नका खाऊ.
सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून,
प्रविण रावांचे नाव घेते पाच गडी राखून.
घास भरवतानाचे उखाणे
Marathi Ukhane on Food
रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
शरद रावांना भरविते मी प्रेमाचा घास.
घास घालणे म्हणजे ऐऱ्यागैऱ्याचा नव्हे खेळ,
……घास घालताच जमला सारा मेळ.
ओंजळीत जमवते शब्द शब्द सौख्याचा,
……रावांना घास घालते लाडूचा.
रंगात कृष्णाच्या राधिका न्हाली,
…….रावांना घास घालताना, वधू पुलकित झाली.
गर्भासारखे असतात विचार मनात बसले की वाढतच जातात,
……रावाना घास घालताना शुभ शुभ म्हणत राहतात.
ओठावरती गाणी म्हणजे सौख्याचा घास,
……रावांना घालते जिलेबीचा घास.
कृष्णलीलेत राधिका गेली न्हाऊन,
……रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून.
नव्या जुन्याच्या संगमातून जडतो नवा पाश,
……रावांना घालते जिलेबीचा घास.
ताटा भोवतीची रांगोळी सांगते काही खास,
……रावांना घालते जिलेबीचा घास.
One Response