सत्यनारायण पूजेचे उखाणे [स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी]

नाकात नथ, पायात जोडवी, पैठणी नेसले लक्ष्मीसारख.

कानात कुड्या, हातात पाटल्या, बांगड्यामध्येच किणकिणती, वेणीत खोपा, नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर कोरलेली.

भांगात कुंकू, हातात तोडे, गळ्यात चंद्रहार मनी शोभतो, साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते आणि ___रावांच नाव घेऊन लक्ष्मीपूजन करते!

सत्यनारायणाच्या पूजेने करू नवीन कार्याची सुरवात,

……रावांचे नाव घेऊन देवापुढे लावते फुल-वात.

श्रावणात आकाशात कडकडतात विजा,

……रावांसोबत करते सत्यनारायणाची पूजा.

आज आहे गावात सत्यनारायणाचा गजर,

……रावांचे नाव घेताना सगळे आहेत हजर.

लाल मणि तोडले काळे मणि जोडले,

……रावांसाठी मी आई वडिल सोडले.

मोत्यांची माळ, सोन्याचा साज,

……रावांचे नाव घेते, सत्यनारायणाची पूजा आहे आज.

पीडयावर पीडे पाच पिडे,

……रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांच्या पुडे.

हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे,

……रावांचे नाव घेते सत्यनारायणापुढे.

ताटभर दगिन्यांपेक्षा माणस असावी घरभर,

……रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर.

फुलांइतकीच मोहक दिसते, गुलाबाची कळी

……रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या वेळी

महादेवाच्या पूजेला बेलाच्या राशी,

……रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी

तुझ्या माझ्या संसाराला, आणखी काय हव,

आई बाबांची ईच्छा आहे, बांधा १ घर नव.

काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत,

……राव गेले कामाला म्हणून मला नाही करमत

बहुतेकांनी वाचले असेल, पुस्तक रामायण,

……रावांचे नाव घेते, आज आहे सत्यनारायण.

रंगीत कपाटात जापानी बाहुली,

……रावांना जन्म देणारी धन्य ती माउली

होम पेटे त्यात, वाईट गोष्टी आणि दुःख सारे जाळते,

……रावांचे नाव घेऊन, सत्यनारायण देवाला ओवाळते.

मुबई ते पुणे पेरला होता लसून,

……राव गेले थकून, आणा त्यांना पालाखित बसून.

सत्यनारायणाची पूजा मनोभावे करते,

……रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.

खोक्यात खोका टिव्ही चा खोका,

……राव गप्प बसा नाहीतर देईन ठोका

माय बाप सेवा, पवित्र हे कर्म,

……रावांचे नाव घेते, हिंदू हाच खरा धर्म.

सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा,

……रावांच्या संसारात आनंदाला नाही तोटा.

घराला असावे अंगण, अंगणात डोलावी तुळस,

……रावांच्या आयुष्यात चढवीन आनंदाचा कळस.

उखाणे घेऊन भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव,

आज आहे सत्यनारायण पूजा ……रावांचे घेते मी नाव.

केळीच्या पानांवर कोवळं कोवळे ऊन,

……रावांचे नाव घेते ……ची सून.

हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी,

……रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

वारुळाला जाऊन मी नागाची पूजा करते,

……रावांचे नाव घेऊन सौभाग्याचा आशीर्वाद मागते.

कुंकू लावते लाल, त्यात पडला मोती,

……राव माझे पति मि त्यांची सौभाग्यवती.

हरतालिकेला करतात पूजा करतात महादेवाची,

……रावांचे नाव घेते आज पूजा आहे सत्यनारायणाची.

स्त्रियांसाठी सत्यनारायण उखाणे
Satyanarayan Pooja Ukhane for Female

अंगणातल्या तुळशीला घालते पळी पळी पाणी,

आधी होते आई वडीलांची तान्ही आता झाले ……रावांची राणी.

……च्या दिवशी, दारावर बांधले तोरण,

…..रावांचे नाव घ्यायला, कशाला हवे कारण?

धनत्रयोदशीला पूजा करतात ऐश्वर्य व धनाची,

……रावांचे नाव घेते आज पूजा आहे सत्यनारायणाची.

कोल्हापूरचा प्रसिद्ध दागिना कोल्हापुरी साज,

……चे नाव घेते सत्यनारायण आहे आज.

रामनामाची ओवी आळवेन मी प्रातःकाळी,

……रावांशी बांधली गाठ म्हणून मी ठरले भाग्यशाली.

नदीला आला पूर समुद्राची झाली भरती,

……राव बसले पलंगावरती मी करते त्यांची आरती.

पूजेला ठेवले आहे, भात आणि वरण,

……रावांचे नाव घ्यायला आहे सत्यनारायण पूजेचे कारण.

राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा,

……रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला सौभाग्याचा.

केळी देते सोलून पेरू देते चिरून,

……स्वामींच्या जिवावर कुंकू लावते कोरुन.

धनत्रयोदशीला पूजा करतात ऐश्वर्य व धनाची,

……रावांचे नाव घेते आज पूजा आहे सत्यनारायणाची.

परिजताकाच्या झाडा खाली हरिण घेतो विसावा,

……रावांच्या पाठीशी सदैव परमेश्वर असावा.

अधिकमासात आईने दिली चांदीची कळशी,

……रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी.

……ची आरास सर्वांना पडली पसंत,

……रावांमुळे फुलला जीवनी वसंत.

अंबाबाईच्या देवळात नैवेद्याच्या राशी,

……रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी.

देव्हाऱ्यापुढे समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी,

……रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी.

आज सोसायटीमध्ये आहे सत्यनारायणाची पूजा,

……रावांचे नाव घेताना, येते मला ऊर्जा.

……च्या समोर, ठेवले केशरी पेढे,

……रावांचे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे?

खाण तशी माती,

……राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती.

नेवेद्याने चांदीचे ताट, रांगोळीने खुलले,

……च्या संसारात, भाग्य माझे फुलले.

कोमेजू नये प्रेम दरवळो सदा प्रीतीचा सुवास,

……रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी तुमच्यासाठी खास.

……ची पूजा मनोभावे करते,

……रावांसाठी दीर्घायुष्य मागते.

कोल्हापूरच्या देवीला सोन्याची साज,

……रावांचं नाव घेते सत्यनारायण पुजा आहे आज.

आता मी आहे दोन मुलांची आई,

……रावांसोबत सत्यनारायण पूजेला बसण्याची मला खूप घाई.

…….समोर ठेवल्या पंचपक्वान्नाच्या राशी,

……रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

गुलाबाचे फुल मधोमध असते पिवळे,

……राव दिसतात कृष्णा सारखे सावळे.

पहिल्या वर्षी वटपूजा थाटामाटात केली,

रूप पाहून माझे ……स्वारी खुश झाली.

येत होती जात होती

घडाळ्यात पाहत होती

घडाळ्यात वाजले एक,

……रावांचे नाव घेते ……ची लेक.

घातली आज मोत्यांची माळ आणि सोन्याचा साज,

……रावांचे नाव घेते कारण सत्यनारायण पूजा आहे आज.

……च्या ……ला आली खूपच धमाल,

……रावांच्या कल्पकतेची आहे सगळी कमाल.

गणपतीला आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी,

……रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी.

ऋतू सोबतीने सारी जुनी झाडे नवी होता,

……रावांसोबत वाचेन मी सत्यनारायणाची कथा.

पुरुषांसाठी सत्यनारायण उखाणे
Satyanarayan Pooja Ukhane for Male

वाल्मिकी ऋषींनी रचले रामायण,

……चे नाव घेतो आज आहे सत्यनारायण.

श्रीकृष्णाने सांगितली अर्जुनला भगवद्गीता,

……चा आहे मी राम तर ती आहे माझी सीता.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला बसतात देवीचे घट,

……करते सगळी कामे पटापट.

सासूबाई आहेत सुगरण तर सासरेबुवा आहेत हौशी,

……चे नाव घेतो सत्यनारायण पूजेच्या दिवशी.

आषाढात आकाशात गडगडतात ढग आणि चमकतात विजा,

……बरोबर करतो सत्यनारायणाची पूजा.

श्रावणाच्या आगमनाने बहरली सृष्टीची कांती,

……च्या येण्याने माझ्या आयुष्यात आली सुख-शांती.

फुलांइतकीच सुंदर दिसते गुलाबाची कळी,

हसल्यावर ……च्या गालावर दिसते सुंदर खळी.

सत्यनारायणाच्या समोर प्रसादाला ठेवले केशरी पेढे,

……चे नाव घ्यायला कशाला घेऊ आढेवेढे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *