हळदी कुंकू मराठी उखाणे
(Marathi Ukhane for Haladi Kunku)
जात होते फुलांला, पदर अडकला वेलीला,
एवढे महत्त्व कशाला प्रीतम रावांच्या नावाला.
शिवाजीसारखा पुत्र, धन्य जिजाऊंची कुशी,
पंडीत रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी
वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस,
कधी कधी पुनव कधी दिवस,
महेश रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस
खूप पहिले तीर्थक्षेत्र पवित्र वाटते काशी,
अजय रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी
पायात जोडवे हि पतीची खूण,
बाबासाहेब रावांचे नाव घेते माधवरावांची सून
लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव, बदलावा लागतो स्वभाव,
अतिश रावांच्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.
अथांग वाहे सागर संथ चालते होडी,
परमेश्वर सुखी ठेवो लक्ष्मण रावांची नी माझी जोडी.
नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी,
अशोक जीवनात नेहा ही गृहिणी.
तुळजाभवानी मते वंदन करते तुला,
रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला
सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,
माधवरावांचे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.
आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकती हिरे,
राव हेच माझे अलंकार खरे
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने