संक्रांती ऊखाणे
(Sankranti Ukhane)

गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशी,

दिपक रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवशी.

असंख्य तारे नभात पाहावेत निरखून,

रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून.

तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा,

रावांचे नाव घ्यायची हीच तर खरी वेळा.

सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,

रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ.

कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी कुंकुवाच्या राशी,

रावांच्या नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या दिवशी.

तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात,

रावंच नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.

नदीकाठी मोर बघा कसा नाचतो,

रावांनी घेतली साडी रंग कसा खुलतो.

पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते, चातकपक्षाची काया,

रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया.

गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी,

रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी.

मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी,

रावांचे नाव घेतेसंक्रातीच्या दिवशी.

जीवनाच्या करंजीत प्रेमासाचे सारण,

रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचे कारण.

तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा,

रावांसोबत रोजच साजरा होतो माझा पाडवा.

सोन्याचे मंगळसूत्र सोनारांनी घडवले,

रावांच्या नावासाठी मैत्रिणींनी अडविले.

सासू माझी मायाळू दीर माझे हौशी,

रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी.

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला ..
खात्ताकन हसला हातावर येताच बोलू लागला,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!

वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सर्व मिपाकरांना मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेछा.

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

तिळगुळ घ्या आणि पाठीमागे गॉड गॉड बोला,

कारण पुढे तर सगळेच गोड बोलतात

विसरुनी जा दुः ख तुझे हे 
मनालाही दे तू विसावा ..
आयुष्याचा पतंग तुझा हा 
प्रत्येक क्षणी गगनी भिडवा ..!!
 
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

कणभर तीळ, मनभर प्रेम
गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!

मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला…
शुभ मकर संक्रांती!

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची
कणभर तीळ, मनभर प्रेम
गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला!

मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्या
आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!!

तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही 
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात 
आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत !!!

नवीन वर्षाच्या,
नवीन सणाच्या,
प्रिय जणांना,
गोड व्यक्तींना,
“मकर संक्रांतीच्या”
सर्वांना गोड गोड शुभेच्छा!!

विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या…
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या…
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

Funny Makar Sankranti Wishes Marathi

बायकोला तिळगुळ देणे हि श्रद्धा आहे आणि

ती गोड बोलेल हि अंधश्रद्धा आहे.

One Response

  1. चांगली माहीती आहे आपल्या मराठी भाषा मध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *