पुरुषांसाठी उखाणे
(Marathi Ukhane for Male)
गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
_ आहे माझी ब्युटी क्वीन.
हा दिवस आहे आमच्या करिता खास,
_ ला देतो गुलाब जामुन चा घास.
_ च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
_ ला पाहून, पडली माझी विकेट.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
_ चे बरोबर बांधली जीवन गाठ.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
_ च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
अग़ अग़ _ खिडकी वर आला बघ काउ,
घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
_ ला देतो मी श्रीखंडाचा घास.
आकाशात उडतोय पक्षांचा थवा,
_ चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा,
शोधून नाही सापडणार _ सारखा हिरा.
मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस,
_ तू फक्त, मस्त गोड हास
अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,
_ ला घास घालतो वरण-भात तूपाचा.
अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश,
सौ. _ चे नाव घेतो तुमच्यासाठी खास.
उगवला रवी, मावळली रजनी,
चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते गुंजन,
सौ. _ सोबत करतो मी सत्यनारायण पुजन.
माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप,
_ ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,
_ चे नाव घेतो _ च्या घरात.
पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे,
_ चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास,
_ ला देतो मी लाडवाचा घास.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
_ चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडी,
सुखी ठेवा गजानना, _ आणि माझी हि जोडी.
ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा
_ मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
_ झाली आज माझी गृहमंत्री.
अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
_ माझी सर्वांपेक्षा सुंदर.
आई-वडील, भाऊ बहीण, जणू गोकुळासारखे घर
_ च्या आगमनाने पडली त्यात भर.
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
_ चे नाव घेऊन सोडतो कंकण.
सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,
_सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.
आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड
_ चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.