Best Marathi Quotes on Mother

माझ्या आयुष्याच्या अंधारात,
ती मेणबत्ती सारखी वितळत राहिली,

आई!

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी।।

 

ठेच लागता माझ्या पायी,

वेदना होती तिच्या हृदयी,

तेहतीस कोटी देवांमध्ये,

श्रेष्ठ मला माझी “आई”

डोळे मिटुन प्रेम करते, ती प्रियासी,

डोळे मिटल्यासारखे प्रेम करते, ती मैत्रिण,

डोळे वटारुण प्रेम करते, ती पत्नी,

आणि

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती फक्त आई

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,

आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी!

एका मुलाने ब्रेकअपच्या वेळी केलेलं वक्तव्य

“माझं प्रेम तु जरी मान्य केल नाही, तरी मी तुझ्यासाठी जीव नाही देणार तुला दुसरा मुलगा जरूर मिळेल, पण माझ्या आईला पुन्हा मी मिळणार नाही”

आई – बाबा
आईने बनवल, बाबानी घडवल,

आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली,

बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला.

आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,

आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली,

आईने लढण्यासठी शक्ती दिली,

बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,

त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे

आई,

लेकराची माय असते,

वासराची गाय असते,

दुधाची साय असते,

लंगड्याचा पाय असते,

धरणीची ठाय असते,

आई असत जन्माची शिदोरी,

सरतही नाही उरतही नाही..!

पूर्वजन्माची पुण्याई असावी

जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,

जग पाहिलं नव्हतं तरी

नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!

‘आई’

हि एकच व्यक्ती आहे जी तुम्हाला सर्वांपेक्षा ९ महिने जास्त ओळखते.

तू माझा जिवलग मित्र आहेस आई, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मला हे जग दाखवल्याबद्दल धन्यवाद.

देव सर्वत्र नसल्यामुळे त्याने आई बनवली.

आई

सर्व प्रेम सुरु होते आणि तिथेच संपते.

जगातील सर्वात चांगली मुलं हि आपल्या आईचा मुलं.

आई, तू घराला सर्वात आनंदी ठिकाण बनवल्याबद्दल धन्यवाद.

आई, तू माझा पहिला मित्र, जिवलग मित्र आणि कायमचा मित्र आहेस.

लहान मुलाच्या ओठात आणि अंतःकरणात आई हे देवाचे नाव असते.

जगात असे एकमेव न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आईचे प्रेम.

आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही आणि तिच्यासारखा खंबीर पाठीराखा हि कोणी नाही.

‘आ’ म्हणजे आस्था आणि ‘ई’ म्हणे ईश्वर 

आईच्या गळ्याभोवती तिच्या पिल्लाने मारलेली मिठी हा तिच्यासाठी सर्वात मोठा दागिना असतो.

ज्या घरात आई नाही,

त्या घरात काही नाही.

देवा,

सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.

आईसारखे दुसरे दैवत नाही.

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *