आपल्या भारतात एकूण तीन ऋतू मानले जातात.त्या मध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा तीन ऋतू आहेत. हा ऋतू मला खूप आवडतो. जेव्हा पावसाळा येणार असतो माझा आनंद गगनात मावेनासा होतो.पहिल्या पावसाच्या गारा जेव्हा पडतात तेव्हा मी आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी मिळून पावसात गारा वेचायला जातो.
पावसाळ्यामध्ये सगळीकडे मातीचा एकदम सुंदर सुगंध दरवळत असतो. पाने हिरवी गार होतात. मग चोहीकडे हिरवी गार झाडे, पाने, डोंगर, दिसते.
माझ्या घराजवळ मोठा डोंगर आहे. पावसाळ्यामध्ये हा पूर्ण डोंगर हिरवागार होतो. त्याचप्रमाणे तेथे धबधबे वाहत असतात. मग मी माझ्या आई बाबांसोबत फिरायला जाते. आम्ही पावसाळ्यामध्ये एकदा तरी सहलीला जातो. तसेच आमची शाळा सुद्धा आमच्यासाठी वर्षा सहलीचे आयोजन करते. खरंच पावसाळ्यात बाहेर फिरण्याची मज्जा वेगळीच असते !
मला पावसाळा आला कि एकच गाणे आठवते,
“येरे येरे पावसा तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा
येग येग सरी माझे मडके भरी
सर आली धाऊन मडके गेले वाहून”
आमच्या शाळेत आम्ही पावसाळा आला कि हे गाणे गातो.
पावसाळा आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे, बाजारात तर रंगबिरंगी, छोट्या, मोठ्या आकाराच्या छत्र्या, रेनकोट, गमबुट इत्यादी विक्रीला असतात. मला वेगळ्या वेगळ्या छत्री आणि रेनकोट घायला खूप आवडते.
पाउस आला की आम्ही खूप मज्जा करतो. पावसाळा आला आणि मी भिजले नाही असे कधीच झालेल नाही. विज कडाडते, ढग गडगडतात आणि मग थंब थेंब पडायला लागतात. जेव्हा विज कडाडते तेंव्हा मला थोड घाबरायला होत, पण त्यानंतर येणाऱ्या धोधो पावसात भिजायची मजा काही वेगळीच असते. पावसाळा आला की आम्ही भोलानाथला पण शोधतो व विचारतो,
“सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय
शाळेभौवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. “
पाउस आला की आम्ही खूप मज्जा करतो. आई कितीही रागावली तरी गारा पडल्या तर ते खायच, कागदाची होडी करून ती वाहत्या पाण्यात सोडणे व कुणाची होडी दूरवर जाते ते बघणे. शाळेत असतांना पाऊस आला की शिक्षकांना सुट्टी देण्याचा आग्रह करतो.शाळेला सुट्टी होताच पाऊस थांबण्याची वाट न बघता धावत पळत, रस्यावर साठलेल पाणी उडवत घरी येतो. मग येता येता चिखलात खेळणे, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे अशी आमची मस्ती चालूच असते.मला कागदाची होडी बनवायला खूप आवडतें. रंगीबेरंगी घोटीव कागद आणून त्याची होडी बनवते. मग जेथे पाण्याचा झरा वाहत असेल तेथे जाउंन ती पाण्यात सोडायची मज्जाच खूप वेगळी आहे.
पावसाळा येताच वातावरण प्रसन्न होते.वातावरणात एक वेगळाच उत्साह असतो. पाण्याला जीवन म्हटलं जातं. त्यामुळे पावसाळा हा अत्यंत महत्त्वाचा ऋतू आहे. मी पावसाची वाट आतुरतेने पाहत असते कारण तो उन्हाळ्याच्या असहनीय गरमी पासून आपली सुटका करतो. तो हवेत थंडावा आणतो.सर्व झाडे फुलून येतात.पक्ष्यांचे मन पण आनंदी होते. फुले पाने आनंदाने बहरून येतात.
पाऊस सुरू झाला की सगळीकडे पाणीच पाणी असते. झाडांना छान पाणी मिळते. घरांची छपरे धुवून निघतात. कधी कधी मात्र मोठ्या माणसांची तारांबळ उडालेली असते. कुणाच्या घरात छतावरून पाणी पडत असते, तर कुणाच्या तरी अंगणात ढोपरभर पाणी साचलेले असते. मग घरातील माणसाची दुरुस्तीसाठी धावपळ होत असते.
बऱ्याच वेळेला पावसाळ्यात बऱ्याच लोकांचे नुकसान होते.घरात पाणी आल्यामुळे अन्नधान्याचे नुकसान होते.डोंगर कोसळतात.समुद्र भरून येतो.नद्यांना पूर येतो.आणि मग सगळ्यांचेच नुकसान होते.हीच एक गोष्ट मला आवडत नाही. पावसाळ्यामध्ये आपल्या देशाचा बळीराजा खूप सुखावतो.याच दिवसांमध्ये पेरणी केली जाते.
खरंच पावसाळा हा ऋतू कायम माझ्या आवडीचा राहील. कारण पावसाळा सगळ्यांच्या आयुष्यात एक वेगळाच आनंद घेऊन येतो.ते म्हणतात ना मन पावन करून टाकतो.