जशी सगळ्यांना आपली शाळा आवडते तशी मला पण माझी शाळा खूप आवडते.माझ्या शाळेचं नाव “अण्णासाहेब कल्याणी विद्यालय” आहे.
माझी शाळा सातारा शहरात आहे.माझ्या शाळेची इमारत खूप उंच, स्वच्छ आणि सुंदर आहे. माझ्या शाळेमध्ये प्रयोगशाळा आणि ग्रंथालय आहे.
माझ्या शाळेभोवती उंचच उंच झाडे आहेत. आमच्या शाळेत एकूण ३००० मुले शिकतात.
आमच्या शाळेचे मुख्याध्यापक खूप कडक आहेत आणि प्रेमळ सुद्धा. ते आम्हाला शिस्त लावतात. शाळेसमोर मोठे क्रीडांगण आहे. दुपारच्या सुट्टीत आम्ही तिथे खेळ खेळतो.
आमचे पी.टी चे शिक्षक आम्हाला त्यांच्या तासाला विविध खेळ खेळायला घेऊन जातात.आम्ही मैदानात खो- खो, कब्बडी, गोळा फेक असे वेगळे वेगळे खेळ खेळतो.
माझ्या शाळेमध्ये खूप छान छान शिक्षक आहेत.ते आम्हाला अभ्यासासोबत बाकी कला पण शिकवतात.माझ्या शाळेतील शिक्षक खूप छान शिकवतात.आम्हाला कविता म्हणायला, चाली लावायला शिकवतात.
विज्ञानाच्या तासाला आम्ही प्रयोगशाळेत जाऊन वेगळे वेगळे प्रयोग करतो.आम्हाला तेथे खूप छान वाटते. आमच्या शाळेतील ग्रंथालय खूप मोठे आहे. तेथे खूप छान छान पुस्तके आहेत.त्या मध्ये गोष्टी, गाणी, महापुरूष कथा अशी छान पुस्तके आहेत.आम्ही तिथे जाऊन रोज पुस्तक वाचन करतो.त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते.
माझ्या शाळेत रोज सकाळी प्रार्थना होते. आम्ही सगळे मैदानात जमा होतो.आम्ही एकत्र राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना म्हणतो.आम्हाला शाळेत खूप छान छान प्रार्थना शिकवल्या जातात.
मला माझ्या शाळेत होणारा प्रत्येक विषयाचा तास खूप आवडतो.माझा सगळ्यात आवडीचा विषय इतिहास आहे.त्या तासाला आम्ही सगळे खूप लक्ष देऊन ऐकतो.
माझ्या शाळेतील सगळे शिक्षक मला खूप आवडतात.ते आम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकवतात.माझ्या शाळेमध्ये वेगळे वेगळे उपक्रम, स्पर्धा असतात.त्या मध्ये आम्ही सगळे भाग घेतो.
मी शाळेतील प्रत्येक स्पर्धेत भाग घेते आणि बक्षीस मिळवते.मला वक्तृत्व करायला खूप आवडते. त्याचप्रमाणें मला निबंध लिहिणे,गाणी म्हणणे सुद्धा आवडते.
माझ्या शाळेत खूप झाडे आहेत.आम्ही पर्यावरण दिनाला शाळेत वृक्षारोपण करतो.आम्हाला शाळेत शिकवले जाते,” झाडे लावा, झाडे जगवा”.
माझ्या शाळेत दरवर्षी खूप मुलं स्कॉलरशिप मध्ये येतात.दहावीला पण खूप मुलांना चांगले गुण मिळतात.
माझ्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षांची खूप तयारी करून घेतली जाते.आम्ही प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो.आमच्या शाळेत खूप मोठे विज्ञान प्रदर्शन भरवले जाते.
त्या मध्ये आम्ही वेगळे वेगळे प्रयोग करून दाखवतो.या मध्ये शेवटी बक्षीस समारंभ असतो ज्याची आम्ही सगळे वाट पाहत असतो.
माझ्या शाळेमध्ये झांज पथक, लेझीम पथक आहे.मी त्या मध्ये पण दरवर्षी भाग घेते.माझ्या शाळेमध्ये वेगळे वेगळे दिवस साजरे केले जातात.
त्या दिवशी आम्ही भाषण करतो.तसेच आमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतो.त्यामध्ये नृत्य, नाट्य, संगीत असे वेगळे वेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.
ज्या मध्ये आम्ही अगदी उत्साहाने भाग घेतो.आमच्या मध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव दिला जातो.माझी शाळा म्हणजे माझा साठी एक मंदिर आहे.माझ्या शाळेत मी घडत आहे.आणि माझं उद्याच भवितव्य हे माझ्या शाळेमध्ये लिहिले जात आहे.
खरच, माझी शाळा “ज्ञानाच माहेरघर” आहे.शाळेत आमच्यावर खूप चांगले संस्कार केले जातात. मोठ्यांचा आदर करणे, हळू आवाजात बोलणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे, स्वच्छ राहणे या सगळ्या गोष्टी आम्हाला शाळेत शिकवल्या जातात.
समाजात आदर मिळवायचा असेल तर अभ्यास करून मोठे झाले पाहिजे हे सुद्धा आम्हाला शाळेत सांगितले जाते.अभ्यास करून आई वडिलांचे नाव मोठे करा असे आमचे शिक्षक नेहमी आम्हाला सांगतात.
अशी आमची शाळा आहे.मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे. शाळेला सुट्टी असली कि मला घरी करमत नाही व रोज शाळेत जावेसे वाटते. मला माझी शाळा खूप खूप आवडते.
मला एवढंच म्हणावंसं वाटतं,
“ज्ञानाचा अथांग सागर, माझी शाळा
सर्व मुलांचे ज्ञानाचे मंदिर, माझी शाळा
माझ्या भविष्याचा पाया, माझी शाळा”.
खरच, मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो.