निसर्गामध्ये आपल्याला विविध रंगांचे पक्षी आढळून येतात. प्रत्येक पक्षी हा आकाराने, रंगाने वेगळा असतो.तसेच प्रत्येक पक्ष्याचा आवाज वेगळा असतो. पक्षी अतिशय आकर्षक आणि मनोवेधक असतात. जसेकी चिमणी, कोकिळा, कबुतर, कावळा, बदक, सुतार पक्षी इत्यादी. अशा विविध पक्ष्यांमध्ये मोर हा माझा आवडता पक्षी आहे. मोर हा पक्षी अतिशय सुंदर, आकर्षक पक्षी आहे.
मोर हा भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी समजला जातो.त्याचप्रमाणे मोर हे सरस्वतीचे वाहन आहे.आपल्या देशात मोराला सौंदर्य आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. मोराचा रंग हा अतिशय सुंदर असतो. मोर कुक्कुटवर्गीय पक्षी आहे. तसेच त्याचा गळा निळ्या रंगाचा असतो. विणीच्या हंगामात मोर नराला पिसारा असतो व विणीचा कालावधी संपताच तो झडून जातो. मोराचे पंख म्हणजेच पिसारा हा निळ्या आणि हिरव्या रंगाचा असतो. मोराची चोचीपासून शेपटीपर्यंत त्याची लांबी १०० ते ११५ सें.मी. असते. पूर्ण वाढलेला पिसारा १९५ ते २२५ सें.मी. लांबीचा असू शकतो.
मोराचे वजन ४ – ६ किलो असते. लांडोर (मादी) आकाराने लहान असतात. त्यांची लांबी साधारणतः ९५ सें.मी. आणि वजन २.७ – ४ किलो असते. लांडोरीला किंचितही पिसारा नसतो. मोराचे अन्न हे झाडाची पाने, किडे, साप, सरडे,आळी आहे. ते काही फळेही खातात. पांढरा मोर दुर्मिळ आहे. हे प्रामुख्याने मोकळ्या जंगलात किंवा शेतात आढळतात, जेथे त्यांना बेरी आणि धान्य मिळते परंतु साप, मांजर, उंदीर आणि खार खातात व पावसाची चाहूल लागताच मोर त्याचा पिसारा फुलवतो आणि नाचतो म्हणूनच आपल्याला पावसाळ्यात जास्त करून मोर दिसतात. त्याचा पिसारा हा अतिशय लांब आणि फुलदार असतो. हे सगळं पाहून एकच गाणं आठवते ,
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा नाच पुलाव पिसारा नाच.”
जेव्हा पाऊस येणार असतो तेव्हा मोर आनंदी होतो आणि आपला पिसारा फुलवून नाच करायला लागतो. मी एकदा माझ्या गावी गेले होते तेव्हा मी मोराला नाच करताना पहिले होते. खूप मज्जा येते त्याला नाच करताना पाहून. मोराचा पिसारा खूप सुंदर आणि रंगीबेरंगी दिसतो. त्याचे डोळे आणि चोच पण खूप छान दिसते. त्याच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो.त्यामुळे तो एकदम रुबाबात चालतो.जेव्हां पाऊस पडण्याच्या आधी ढगांचा गडगडाट होतो तेव्हा मोर थुईथुई नाचतो.
त्यांना ढगांचा गडगडाट आवाज खुप आवडतो. मोरांचे वजन इतर पक्ष्यांपेक्षा जास्त असते. तर ते आकाशात उंच उडू शकत नाही.मोर शेतकर्यांचे मित्र आहेत.मोर धान्य,कीटक,सरडे खातो.उंदीर,साप यांना खाऊन तो शेताची नासाडी होऊ देत नाही.त्यामुळे मोर हा शेतकऱ्यांना मदत पीक वाचवायला मदत करतो. मोराचे पीस सजावट करण्यासाठी वापरतात.
मोर हा पक्षी गुजरात राजस्थान या भागात घरासमोर जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे भारतात मोर पाळायला कायद्याने परवानगी काढावी लागते. जवळपास मोर असले आणि मोरांना नियमित खायला दिले तर मोर नियमित त्या घरात वावरतात. परंतु मोर आता दुर्मिळ झाले आहे.वातावरणातील बदल आणि वाढती लोकसंख्या यामुळे त्यांचे प्रमाण कमी झालेले आहे.मोर हे शक्यतो जेथे जास्त झाडे असतात त्या भागात जास्त आढळून येतात.जमिनीवर पडलेले अन्न खातात. त्याचप्रमाणे ते झाडाच्या फांदीवर सुद्धा राहणे पसंत करतात.
आमच्या शाळेत आम्ही नाच रे मोरा या गाण्यावर सुद्धा डान्स केला होता. मोर पाहण्याचं आकर्षण मला लहानपणापासूनच होत. मी माझ्या आई -बाबांसोबत नेहमी मोर पाहायला जायचे.
मला एवढंच वाटत “मोरा रे मोरा तू दिसतोस किती छान”! खरंच मला मोर हा पक्षी मनापासून खूप खूप आवडतो.