दिवाळी निबंध

माझा आवडता सण दिवाळी

आपला भारत देश हा सर्वगुणसंपन्न समजला जातो.आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशात अनेक जातींचे, विविध भाषा बोलणारे लोक आहेत.त्यामुळे आपल्या देशात विविध सण उत्सव साजरे केले जातात. त्याचप्रमाणे आपल्या देशात सण साजरे करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे.आपण दसरा, दिवाळी, संक्रांत, गणपती, होळी, रक्षाबंधन हे सण साजरे करतो.अशा अनेक सणांमध्ये माझा आवडता सण आहे दिवाळी.

 दिवाळी म्हणजे च दिव्यांचा उत्सव, रोषणाई समजली जाते.दिवाळी मध्ये विविध दिव्यांची आरास सजवली जाते.म्हणूनच त्याला आपण दिवाळी असे म्हणतो.

दिवाळी हा सण अश्विन कार्तिक या मराठी महिन्यात साजरा केला जातो.लोक अगदी उत्साहाने या सणांची वाट पाहत असतात.दिवाळी आली की शाळेला सुट्टी दिली जाते.मग घरी आई फराळाची तयारी करते.माझी आई चकली, लाडू, चिवडा, शंकरपाळी, शेव असे वेगळे वेगळे खमंग पदार्थ घरीच बनवते.मला लाडू खूप आवडतो.

मग आई जेव्हा बनवत असते तेव्हाच मी खाऊन घेते.दिवाळी मध्ये सगळे जण किल्ला बनवतात, मग मी पण माझा मित्र मैत्रिणींसोबत किल्ला बनवते, मग आम्ही सकाळपासून सगळे दगड, माती, विटा गोळा करत असतो.सगळे मिळून छान मोठा किल्ला बनवतो.

मग माझे बाबा किल्ल्यावर मांडायला सैनिक घेऊन येतात.मला मातीत खेळायला खूप आवडते.म्हणूनच किल्ला बनवणे हा माझा दिवाळी मधला आवडता दिवस असतो.

दिवाळीला आपण छान छान नवीन कपडे घेतो.दरवर्षी आई बाबा मला माझ्या आवडीचे कपडे घेतात.त्याच प्रमाणे फटाके घेऊन येतात.मला फुलबाज्या, पाऊस, भुईचक्र उडवायला खूप आवडत. दिवाळीची जी पहिली पहाट असते तेव्हा मी सकाळी लवकर उठते.

मग नवीन कपडे घालून फटाके उडवायला जाते. माझे सगळे मित्र मैत्रिणी मला भेटायला येतात.मग आम्ही एकमेकांच्या घरी फराळ करायला जातो.खरच, दिवाळी एक वेगळाच आनंद देऊन जाते.

दिवाळीला जो आकाशकंदील आपण लावतो, रात्री पणत्या लावतो त्यामुळे सगळीकडे रोषणाई झालेली दिसते.सगळं काही रंगीबेरंगी दिसते.मला आकाशात उंच उडणारे फटाके पाहायला सुद्धा खूप आवडते.मी आमच्या अंगणात खूप पणत्या लावते.

तसेच पूर्ण घर फुलांनी सजवते.त्यामुळे घरी आलेले पाहुणे आवर्जून माझं कौतुक करतात.शाळेत आम्हाला विविध दिवाळी उपक्रम दिलेले असतात.ते उपक्रम पण मी वेळ काढून पूर्ण करते.

दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी माझे छंद पण जोपासत असते.चित्र काढणे, नृत्य करणे या मध्ये पण मी माझा वेळ घालवत असते.त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत आपण स्वतःला वेळ देतो.

तसेच दिवाळी मध्ये मी माझ्या आई बाबांसोबत फुलबाजे आणि पाऊस उडवते.आई बाबा सोबत वेळ घालवायला खूप आवडते.

दिवाळीमध्ये असणारी भाऊबीज पण मला खूप आवडते.त्या दिवशी सगळे दादा माझ्या घरी येतात.मग मी त्यांना ओवाळते आणि मला खूप सारे चॉकलेट मिळतात.

दिवाळी मध्ये लक्ष्मीपूजन केले जाते.त्या दिवशी मी माझ्या आईसोबत मिळून सुंदर रांगोळी काढते.आईला पूजा मांडायला मदत करते.मग आम्ही आरती करतो.पूजा करतो.आणि मग सगळे मिळून अंगणात फटाके फोडतो.

दिवाळी असल्यामुळे घरात एक वेगळेच उत्साहाचे वातावरण असते.सगळे आनंदाने या उत्साहात सहभागी होतात.दिवाळीच्या  निमित्ताने सगळे एकमेकांच्या घरी जातात येतात.सगळ्यांच्या घरचा फराळ चाखायला मिळतो.

खरंच,

दिवाळी म्हणजे आनंद
दिवाळी म्हणजे उत्साह
दिवाळी म्हणजे रोषणाई
दिवाळी म्हणजे प्रेम
दिवाळी म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता सण

दिवाळी येणार म्हणून माझ्यासारखे उत्साही होणारे अनेक मुलं असतात.

दिवाळी ची तयारी करण्यापासून ते दिवाळी साजरी होईपर्यंत सगळे अगदी जोशात काम करत असतात.हा सण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य घेऊन येतो.

प्रेम, अपलुकी, जिव्हाळा, बांधिलकी हे सगळे भाव हा सण असताना व्यक्त होतात.

म्हणूनच, मला दिवाळी हा सण खूप खूप आवडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *